Video | भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
साकोली येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आमदार नाना पटोले यांच्यावर पैशांचा वर्षाव झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान नाना पटोले मंचावर जाऊन कलावंतांचे कौतुक करत होते. त्यावेळी त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दाद दिली. या कृतीचा काहींनी सकारात्मक अर्थ घेतला असून कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काहींनी या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी याला परंपरेचा भाग मानले आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापेल की काय? असं सांगितलं जात आहे.
Published on: May 03, 2026 01:24 PM
Follow Us