नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून…

नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून…

| Updated on: Jun 04, 2026 | 6:33 PM

नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे.

नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे. याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने दोन तीन वेळा चौकशी केली आहे. त्यांची अजून एकदा चौकशी करण्यात आली. त्यांनी निदा खान हिच्याशी कशी भेट झाली, ते तिला कसे ओळख होते याची माहिती दिली.

पोलिसांच्या मते मतीन पटेलकडून आणखी अनेक खुलासे होण्याची शक्याता आहे. त्यमुमळे गेल्या तीन तासांपासू मतीन पटेलचीकसून चोकशी सुरु आहे.
दरम्यान, मतीनने सांगितल्याप्रमाणे ‘तर निदा खान हिला आपण ओळखत नव्हतो. निदा खान माझ्या कार्यालयात आली होती. तिला मी 2-3 दिवसांसाठी रुम दिली होती. मला निदा खान कोण आहे हे माहिती नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी मला फोन केला होता. त्यानंतर निदा खानचा फोन आला होता.’ त्याने स्वतःच्या बचावासाठी असं सांगतलं असावं, अशी शंका आहे

Published on: Jun 04, 2026 6:33 PM
Follow Us