Nashik Rain :नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; छोटी-मोठी मंदिरं पाण्याखाली गेली
Nashik Weather : नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. सकाळपासूनच नाशिकच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांना पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपत्रात मोठी वाढ झाली आहे.
नाशिकमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून रामकुंड आणि गोदा घाट परिसरात पुरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने आज नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तसंच पावसाच्या जोरामुळे शहरातील वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली असून, सकाळी शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये पोहोचताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

