Nashik News : नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
Stone Pelting In Nashik' : नाशिकमधील काठे गल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली. यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असून वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
नाशिकमधील काठे गल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली. या घटनेत 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून 5 वाहनांचं नुकसान झालं आहे. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्याने हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेले अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलं जाणार आहे. आज पहाटेपासून या तोड कामाला पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. पोलीसबंदोबस्तात हे स्थळ पूर्णपणे जमीनदोस्त केली जाणार आहे. दरम्यान, काल रात्री प्रचंड मोठ्या संख्येने जमाव पोलिसांवर धावून आला होता. यात जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी जखमी झालेले आहेत. या घटनेत 5 वाहनांचं नुकसान देखील झालं आहे. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने जमाव पांगला. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

