Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. बंडखोरीमुळे चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला असून महायुतीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. बंडखोरीमुळे चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला असून महायुतीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नाशिकमध्ये विजय मिळवला असून केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगितले जात आहे. गीते यांना एकूण 389 मतं मिळाल्याची माहिती आहे. मतदान केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू असून “हमसे जो टकरायेगा वो मिट्टी में मिल जायेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही गीते समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. दुसरीकडे या निकालामुळे महायुतीतील वातावरण गंभीर झाले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकची जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना उतरवण्यात आले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 17 जागांच्या निवडणुकीत नाशिकची ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत गोकुळ गीते यांना 357 मतं तर नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेदरम्यान 13 मतं अवैध ठरवण्यात आली. विजयासाठी आवश्यक असलेला 303 मतांचा कोटा गीते यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केला.
त्यामुळे दुसरी फेरी होणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
