शरद पवारांवर जिवापाड प्रेम करणारा अवलिया; काढलं छातीवर टॅटू अन् व्यक्त केली एकच इच्छा…
शरद पवार यांच्या प्रेमापोटीच रघुनाथ झिंजाडे या अवलिया कार्यकर्त्याने आपल्या छातीवर थेट शरद पवारच रेखाटून घेतले. छातीवर गोंदण करणाऱ्या रघुनाथ झिंजाडे अवलियाला आता फक्त शरद पवार यांच्या भेटीची आतुरता असल्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे शरद पवार आणि त्यांच्या पवार कुटूंबियांवर प्रेम करणाऱ्या एका अवलियाने केलेल्या कृतीमुळे त्याची सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. हा अवलिया शरद पवार यांचा तुफान फॅन आहे. जेव्हापासून त्याने मतदानाचा हक्क बजावण्यास सुरूवात केली तेव्हापासून तो शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे त्यांने टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. करमाळा तालुक्यातील पोथरे येथील रघुनाथ झिंजाडे या नावाच्या कार्यकर्त्यांने आपल्या छातीवर शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचे टॅटू गोंदले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेला करमाळयात १०० टक्के तुतारी वाजणार असा विश्वास रघुनाथ झिंजाडे या कार्यकर्त्याने व्यक्त केला. रघुनाथ झिंजाडे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना पवार कुटूंबियांवर ते वीस वर्षांपासून प्रेम करत असल्याचे सांगितले. बघा व्हिडीओ..
Latest Videos
Latest News