Vaishnavi Hagawane Case : अजितदादांचा वैष्णवी हगवणेंच्या वडिलांना फोन, दिलं मोठं आश्वासन, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीत असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून ही हत्या होती आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीतून राजेंद्र हगवणेंची हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधल्याचे समोर आले आहे. यावेळी कसपटे यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यादेखील हजर होत्या. ‘अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांशी आज फोनवरून संवाद साधला. राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांना राजकीय पाठबळ मिळतंय. तर आज अजित दादांनी वैष्णवीच्या वडिलांना अनिल कसपटे यांना फोन केला आणि सांगितलं कोणत्याही अशा गुन्हेगाराला अजित पवार पाठबळ देत नसतो.’, असा संवाद या दोघांमध्ये झाल्याचे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. तर अजित पवार वैष्णवीच्या वडिलांना धीर देत असेही म्हणाले की, मी तुमच्या पाठिशी आहे. चिंता करू नका आणि फरार असणाऱ्या राजेंद्र हगवणे यांना शोधण्यासाठी तीन पथकं पाठवले असल्याचेही त्यांना सांगितले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

