“मी अजित पवार यांच्यासोबतच, येणाऱ्या निवडणुकीत अडचण येणार नाही, दादांनी शब्द दिलाय”, राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया

“मी अजित पवार यांच्यासोबतच, येणाऱ्या निवडणुकीत अडचण येणार नाही, दादांनी शब्द दिलाय”, राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया

apeksha sakpal | Updated on: Jul 03, 2023 | 3:40 PM

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांनी चुकूनी सही केली, असं शरद पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यांनी चुकूनी सही केली, असं शरद पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी अजित दादांच्या सोबत आहे. पण शरद पवार आमचे नेते आहेत. कोणी चुकून सही केली नाही आहे, वाचूनच सह्या केल्या आहेत.आम्ही राष्ट्रवादीसोबतचं आहोत, म्हणजेच दादांच्यासोबत आहोत. आम्हाला कुठलीच तांत्रिक अडचण येणार नाही. दादांनी अभ्यास करूनच निर्णय घेतला. मतदारसंघाचा विकास दादा करतील. येणाऱ्या निवडणुकीत अडचण येणार नाही..दादांनी आम्हाला तसा शब्द दिला आहे,” असं नितीन जाधव म्हणाले.

Published on: Jul 03, 2023 3:40 PM
Follow Us