अरे याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर बोलायची लायकी…, लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

अरे याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर बोलायची लायकी…, लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

Harshada Shinkar | Updated on: Jun 21, 2024 | 5:33 PM

Laxman Hake On Jarange Patil : जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा. कारण मंडल आयोग 1993-94 मध्ये लागू झाला आहे आणि 70 वर्षे आणले कुठून? असा सवाल करत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शुन्यसु्द्धा ज्ञान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. मंडल आयोग लागू होऊन 27 ते 28 वर्षे झाली आहेत आणि 70 टक्क्यांचा जावयी शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो, जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा. कारण मंडल आयोग 1993-94 मध्ये लागू झाला आहे आणि 70 वर्षे आणले कुठून? असा सवाल करत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, अरे याला आधी शिक्षण द्या. याला अगोदर पॉलिसी शिकवा. माझी चिडचिड होते मला मान्य आहे. मी थोडसं एकेरी बोलतोय. पण आमच्या या वेदना आहेत, म्हणून हे शब्द येत आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. जालन्याच्या वडीगोद्री गावात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके बोलत होते.

Published on: Jun 21, 2024 5:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us