Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरची थेट अमेरिकेत वाह वाह… भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं…
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, शनिवारी पाकिस्तानवर झालेल्या भारतीय हल्ल्यांमध्ये किमान सहा हवाई तळांवरील धावपट्ट्या आणि संरचनांचे नुकसान झाले. तज्ञांनी सांगितले की, प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील हा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक हल्ला होता. भारताकडून होणारे हल्ले देशाच्या आत १०० मैलांपर्यंत पसरले होते.
दहशतवादाविरुद्ध भारताच्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा जगभरात सुरू आहे. भारताने केलेल्या जोरदार एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच उद्ध्वस्त झाला आहे. पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानची एक एक पोल खोलत आहे. झालेल्या दारुण पराभवानंतरही, पाकिस्तानने जगभर असा खोटा प्रचार पसरवला की त्यांचे थोडेसेही नुकसान झाले नाही. मात्र भारतीय लष्कराकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि भारताने पुराव्यांसह पाकला उघडं पाडलं. अशा परिस्थितीत, पहिले न्यू यॉर्क टाईम्स आणि आता वॉशिंग्टन पोस्टने पाकिस्तानचा दुष्ट चेहरा उघड केला आहे. यामध्ये भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या एअरबेसचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानमधील सहा एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचे सॅटलाईट इमेज वापरून अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून ऑपरेशन सिंदूरचं सविस्तर विश्लेषण करण्यात आलं आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दशकांपासूनच्या संघर्षातील हा सर्वात मोठा हल्ला होता, असं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय. तर न्यू यॉर्क टाईम्सने काय केलं वृत्तांकन बघा?
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

