Operation Sindoor : भय बिनु होय न प्रीत, इशारा ही काफी है… भारतीय लष्कर पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
भय बिनु होय न प्रीत, इशारा ही काफी है, असं भारतीय लष्कराकडून आजच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. पहलगामनंतर पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता. आता आपले सर्व एअरबेस ऑपरेशनल, पुढील मिशनसाठी तयार आणि सज्ज, असल्याचेही भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय.
ऑपरेशन सिंदूरबाबत नुकतीच लष्कराची एक पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्हाला जे करायचं होतं ते काम आम्ही पूर्ण केलंय. तसंच पुढच्या मिशनसाठी आम्ही सज्ज असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. तर प्रत्येक लढाई ही वेगळ्या पद्धतीने लढली जाते. आम्ही कोणत्याही लढाईसाठी सज्ज आहोत. तर भारताची मल्टीलेअर सिस्टीम भेदणं हे अशक्य असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना साथ दिली. आमची लढाई पाकिस्तानी सैन्यासोबत नाही तर दहशतवादाविरोधात आहे. पाकिस्तानात झालेल्या नुकसानाला पाकिस्तानी सैन्यच जबाबदार असल्याचे स्पष्टपणे भारतीय लष्कराने म्हटलंय. यासह पाकिस्तानने वापरलेले चीनचे पीएल १५ मिसाईल आपण पाडलं. इतकंच नाहीतर पाकिस्तानच्या ड्रोनला लेझर गनने पाडलं. भारत पाकचं युद्ध सुरू असताना पाकिस्तानने तुर्कीचे ड्रोन वापरले होते पण भारताने ते पाडले. बघा लष्कराच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

