पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच… नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती

पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच… नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती

| Updated on: Jun 24, 2026 | 1:07 PM

अलीकडील काही दिवसांपासून राज्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचीच चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यालगतच्या कालावधीतच त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता.

अलीकडील काही दिवसांपासून राज्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचीच चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यालगतच्या कालावधीतच त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता. पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्या हत्येचा आरोप माजी गृहमंत्री आणि नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांवर होता. कोर्टाने दिलेल्या निकालात हे सर्वजण पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त झाले. यानंतर आता या दोन्ही कुटुंबातील राजकीय वाद पुन्हा उफाळला आहे. या निकालाआधीही अनेक वेळा पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे यांच्यात खटके उडत असत. दोन्ही धाराशिव येथील नेते आहेत.

दरम्यान, आता राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे की ओमराजे आता एनडीएमध्ये आलेत त्यामुळे प्रतिस्पर्धी नाहीत. तर ओमराजेंनी सांगितलं ते कोणत्याही पक्षात असले तरी विरोधच करणार… वैर आहे तो आहेच…

या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. पवनराजे निंबाळकर प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे धाराशिवमध्येच एक सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेत पद्मसिंह पाटील यांचा सत्कार होणार असल्याची माहिती पाटलांचे नातू मल्हार पाटील यांनी दिली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ही सभा पार पडणार आहे.

Published on: Jun 24, 2026 1:00 PM
Follow Us