Asim Munir : फील्ड मार्शलच्या पदावर बसणार मुनिर; भारतावर हल्ले केले म्हणून असीम मुनिरचं प्रमोशन
Asim Munir Field Marshal : पाकिस्तानचा आर्मी प्रमुख असीम मुनिर याला पाकिस्तानी मंत्रिमंडळकडून बढती देण्यात आलेली आहे. याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.
पाकिस्तानचा आर्मी प्रमुख असीम मुनिरचं प्रमोशन झालेलं आहे. असीम मुनिर याला फील्ड मार्शल करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफ याच्या कॅबिनेटचा हा निर्णय आहे.
पाकिस्तानचा लष्करी अधिकारी असीम मुनिर हा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चांगलाच चर्चेत आला. तो पाकिस्तानी लष्करात जनरल या मोठ्या हुद्द्यावर आहे. असे असतानाच आता ससीम मुनीरला बढती मिळाली आहे. मुनीर आता थेट फील्ड मार्शल या पदावर जाऊन बसला आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने त्याच्या या बढतीला परवानगी दिलेली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयानेचे तसं अधिकृतपणे सांगितलं देखील आहे. पाकिस्तानच्या लष्करात फील्ड मार्शल हे फार महत्त्वाचे आणि मोठे पद आहे. फक्त लष्कराबाबतच नव्हे तर देशाच्या रणनीतीविषयक अधिकारांतही हस्तक्षेप करण्याचा अधिकार हे पद मिळणाऱ्याला असतो.

ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर घास..., मनसेचा ठाकरेंवर निशाणा

माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?

लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण...

मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका
