Shahbaz Sharif : भारताने मोठी चूक केली आता प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला… बावचळलेल्या पाककडून पोकळ धमकी अन् शाहजाब शरीफ बरळला
शाहबाज शरीफ यांनी संसदेत भाषण करताना भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे झालेले नुकसान मान्य केले होते. त्यांनी दावा केला की काल रात्री आम्हाला प्रत्येक क्षणाचे अपडेट्स मिळत होते. काल रात्री भारताने पूर्व तयारीने हल्ला केला आणि ८० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील ६ ठिकाणांना लक्ष्य केले.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला काल भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बावचळलेला पाकिस्तान काही केल्या शांत बसेना… पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ याने भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिल्याचे पाहायला मिळतंय. भारताने काल रात्री ऑपरेशन सिंदूर करून मोठी चूक केली. मृतांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेणार असल्याचं शरीफ याने म्हटलंय. तर योग्य उत्तर कसं द्यायचं हे पाकिस्तानला बरोबर माहिती आहे, असंही पाकिस्तानचा पंतप्रधान बरळला आहे. देशवासियांना उद्देशून बोलताना पाकचा पंतप्रधान म्हणाला, आपण आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा शरीफने दिला. भारताच्या कारवाईमुळे आतापर्यंत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे, असा दावा पाक पंतप्रधानांनी केला आहे. ४० हून अधिक लोक जखमी झाले असून यावेळे मृतांना “शहीद” असे संबोधले आणि सांगितले की संपूर्ण पाकिस्तान या शहीदांच्या पाठीशी उभा आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

