Operation Sindoor : बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं पुन्हा टार्गेट, कुठं सापडली पाकिस्तानी मिसाईल?
अमृतसरच्या जथुवालमध्ये पाकिस्तानी मिसाईल आढळली. मिसाईलमुळे आजूबाजूच्या जमिनीला किंवा नागरिकांना कोणतेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर पोलिसांनी ग्रामस्थांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
भारताकडून पाकिस्तानवर बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक करण्यात आला. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्या हल्ल्यानंतर अमृतसरमध्ये सुमारे ६ वेळा स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर येथे दोनदा वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील अमृतसरच्या जथुवाल गावाजवळ पाकिस्तानी मिसाईल आढळली असून त्याचे फोटो समोर आले आहे. सुदैवाने पाकिस्तानच्या मिसाईलमुळे कोणालाही नुकसान झाले नाही. गुरुवारी सकाळी पंजाबमधील एका सीमावर्ती गावात मिसाईलचा भाग सापडल्यानंतर खळबळ उडाली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. मिसाईलचा हा भाग अमृतसरच्या जथुवाल, दुधारा आणि पंधेर गावात आढळला, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

