Pakistan : पाक लष्करी प्रवक्ताच्या तोंडी हाफिज सईदची भाषा, भारताला पोकळ धमकी देत म्हणाला, तुमचा श्वास…
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला होता. या काळात पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पावलामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले, पण तरीही पाकिस्तान सुधारण्यास तयार नाही
भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूरनंतरच्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं तरी देखील पाकिस्तानची मस्ती काही कमी झाली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू, अशी धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानचा लष्करी प्रवक्ताच्या तोंडी हाफिज सईदची भाषा पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानी लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीने भारताला पोकळ धमकी दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला होता. अहमद चौधरी अलीकडेच पाकिस्तानमधील एका विद्यापीठात भाषण देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने बोलताना सिंधू पाणी करारावरून भारताला धमकी दिली. तर पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरी यांनी दहशतवादी हाफिज सईदची भाषा वापरल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला, “जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.” दहशतवादी हाफिजनेही हे विधान काही दिवसांपूर्वी केल्याचे पाहायला मिळाले होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

