थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर…, आर्थिक फायद्यासाठी केलं भयानक कृत्य

थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर…, आर्थिक फायद्यासाठी केलं भयानक कृत्य

| Updated on: May 07, 2026 | 5:06 PM

बीड जिल्ह्यातील परळी येथे एका गर्भवती महिलेसोबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. गीते रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बीड जिल्ह्यातील परळी येथे एका गर्भवती महिलेसोबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. गीते रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य तपासणी आणि सोनोग्राफी न करता तिला घरी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर दुसऱ्या रुग्णालयात तपासणी केली असता गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही नॉर्मल डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली मृत भ्रूण तब्बल 22 तास महिलेच्या पोटातच ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्राथमिक तपासात महिला डॉक्टरने जस्त पैसे उकळ्यांसाठीदेखील हा प्रकार केला असावा, असा संशय आहे. या प्रकारामुळे महिलेच्या जीवावरही धोका निर्माण झाला होता. संतप्त कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे

Published on: May 07, 2026 5:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us