Video : पोलिस संरक्षण काढून ये मग…  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज

Video : पोलिस संरक्षण काढून ये मग… फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज

| Updated on: Aug 20, 2026 | 5:51 PM

फलटणमध्ये रामराजे आणि रणजीत निंबाळकरांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. रणजीत निंबाळकरांनी पोलीस संरक्षणाशिवाय गजानन चौकात येऊन रामराजेंच्या निवासस्थानासमोरून बुलेटवरून फेरफटका मारला.

फलटणमध्ये रामराजे  निंबाळकर आणि रणजीत निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे. रणजीत निंबाळकरांनी पोलीस संरक्षणाशिवाय फलटणमधील गजानन चौकामध्ये येण्याचे आव्हान स्वीकारले. विशेष म्हणजे, त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानासमोरून बुलेटवरून फेरफटका मारत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना रणजीत निंबाळकर यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. “तुम्ही कसे असला तरी मी माझे मानलेले आहेत. तुमच्या लाता खाईन, तुमच्या शिव्या खाईन, पण मुच्छडच्या शिव्या खाणार नाही,” असे ते म्हणाले. मुच्छडला सत्ते नाही, शेवटपर्यंत त्याला लढत द्यायला लागणार आणि त्याच्यात हिंमत नाही, असे म्हणत त्यांनी पोलीस संरक्षण बाजूला काढून समोर येण्याचे आव्हान दिले.

निंबाळकर पुढे म्हणाले की, “मी एकटाच आलो आहे आणि तुमच्यासमोर एकटाच बसलो आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांनाही पुढे न येण्याचे आव्हान केले आहे.” कुठलेही पोलीस संरक्षण नसताना आपण इथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. “काय मला गोळ्या घालायच्यात, काय घालायच्यात एकदम ती काय तुमच्या मनात आहे ते करून दाखवा. तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता मी संरक्षणाशिवाय इथे आलो आहे,” असे धक्कादायक विधानही त्यांनी केले. नुसते आव्हान देऊन चालत नाही, एकदा तरी आपली मर्दुमकी दाखवा, असे म्हणत रणजीत निंबाळकरांनी फलटणमधील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.

Published on: Aug 20, 2026 5:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us