Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत ललिता कुमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची देशभरात अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक आयोगाला या तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत आहे.
याचिकेत असा आरोप आहे की, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांविरुद्ध हिंसाचार करतात आणि भाषेच्या आधारावर राजकारण करतात. हे कृत्य संविधानाच्या मूलभूत भावनेच्या आणि ललिता कुमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

