PM Modi in Dehu: पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उदघाटन
तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे दाखल झालेले आहेत. या निमित्याने देहू येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गायिका कार्तिकी गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात सहभाग आहे. तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करतील. नरेंद्र मोदी हे देहू येथे येणारे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. या […]

तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे दाखल झालेले आहेत. या निमित्याने देहू येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गायिका कार्तिकी गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात सहभाग आहे. तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करतील. नरेंद्र मोदी हे देहू येथे येणारे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. या सोहळ्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सभा स्थळ फुलांनी सजविण्यात आलेले आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्तही मोठा आहे. कार्यक्रम ठिकाणी स्थानिक नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.
