PM Narendra Modi : तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
PM Modi On Bharat - Pakistan Conflict : भारत पाकिस्तानमधील तणाव परिस्थितीनंतर आज मोदी पहिल्यांदा अदमपुर एअर बेसवर भेट देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी जवानांना भेटून त्यांचं कौतुक केलं.
जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटीवर देऊ, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमधील तणाव परिस्थितीनंतर आज मोदी पहिल्यांदा अदमपुर एअर बेसवर भेट देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी जवानांना भेटून त्यांचं कौतुक केलं. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संबोधन करताना ते बोलत होते.
पुढे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, या निर्णया मागे आधार, विश्वास, तुमचं धैर्य, शौर्य. साहस आणि सजगता आहे. तुमचं धैर्य असंच कायम ठेवा. आपल्याला कायम सावध आणि तयार राहिलं पाहिजे. आपल्याला शत्रूंना आठवण करून देत राहायचं आहे की, हा नवा भारत आहे. या भारताला शांतता हवी. पण मानवतेवर हल्ला झाला तर हा भारत युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमतं, असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

