PM Narendra Modi : युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा थेट इशारा
PM Modi In Adampur Air Base : अदमपुर एअर बेस येथे भारतीय सैन्यातील हवाई दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत त्यांचं कौतुक केलं.
मी अभिमानाने सांगू शकतो तुम्ही सर्वांनी तुम्ही तुमचं टार्गेट साधलं. पाकिस्तानात अतिरेकी ठिकाणे आणि त्यांचे एअरबेसच बरबाद झाले नाही तर त्यांचे नापाक इरादे आणि दुस्साहस या दोघांचा पराभव झाला आहे. ऑपरेशन सिंदूरने चवताळलेल्या शत्रूने आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वारंवार आपल्याला टार्गेट केला. पण पाकचे नापाक इरादे प्रत्येकवेळी नाकाम झाले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अदमपुर एअर बेस येथे भारतीय सैन्यातील हवाई दलाच्या जवानांना संबोधित करताना म्हंटलं आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी अदमपुर येथे भेट देऊन जवानांनच्या शौर्याचं कौतुक केलं.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानचे ड्रोन, त्यांचे यूएव्ही, पाकिस्तानचे एअरक्राफ्ट, त्यांचे मिसाईल आमच्या सशक्त तंत्रज्ञानापुढे फेल गेले. तुम्ही खूप चांगलं काम केलं. दहशतवादा विरूद्ध भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. आता टेरर अटॅक झाला तर भारत उत्तर देईल आणि पक्कं उत्तर देईल. आपण सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक द्वारे पाहिलं आहे. आता ऑपरेशन सिंदूर भारताचं न्यू नॉर्मल आहे. भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटीवर देऊ. तुमचं धैर्य असंच कायम ठेवा. भारताला शांतता हवी. पण मानवतेवर हल्ला झाला तर हा भारत युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमतं, असा इशाराच पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला यावेळी दिला आहे.

