कलेक्टरिन बाईंची ‘कुंडली’ वादात, पूजा खेडकरांना हवा होता शाहीथाट पण बाहेर निघाला नियुक्तीचाच वाद

| Updated on: Jul 12, 2024 | 11:03 AM

वारेमाप संपत्ती असूनही त्यांची ओबीसी कोट्यातून नियुक्ती कशी झाली. अपंगत्वाचं सर्टिफिकेट कुणी तपासलं? यावरून आरोप होऊ लागलेत. शासकीय पाटी, सरकारी दिवा आणि कॅबिनचा सोस कलेक्टरिन बाईंच्या अंगावर उलटलाय. कारण शाहीथाटाच्या नादातच पूजा खेडकर यांची कुंडलीच आता बाहेर निघाली

वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकाऱ्याचा शाहीथाट चर्चेत राहिला. पण त्या नादात त्यांच्या नियुक्तीचा वाद बाहेर आला. वारेमाप संपत्ती असूनही त्यांची ओबीसी कोट्यातून नियुक्ती कशी झाली. अपंगत्वाचं सर्टिफिकेट कुणी तपासलं? यावरून आरोप होऊ लागलेत. शासकीय पाटी, सरकारी दिवा आणि कॅबिनचा सोस कलेक्टरिन बाईंच्या अंगावर उलटलाय. कारण शाहीथाटाच्या नादातच पूजा खेडकर यांची कुंडलीच आता बाहेर येत आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या. प्रशिक्षणादरम्यान खासगी गाडीला नियमबाह्य सरकारी दिवा लावला अन् त्या वादात आला. तर पोस्टिंगच्या वेळी वरिष्ठांची कॅबिन बळकावणं, स्वतंत्र घर, शिपाईसाठी आग्रह अशा तक्रारी आल्यात वाद वाढल्यानंतर त्यांची वाशिमला बदली केली. तर नियुक्तीवेळी दाखवलेलं अपंगत्वाचं सर्टिफिकेट वादात आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

Published on: Jul 12, 2024 11:03 AM
Follow Us