MNS : मुंबईत ‘अमराठी’वरून वाद पेटला, मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात मोर्चा, पालिका निवडणुकांआधी वातावरण तापलं
मराठीच्या मुद्द्यावरून पाच तारखेला ठाकरे बंधूंचा मेळावा आहे. पण मीरा भाईंदरमध्ये मनसेच्याच विरोधात मोर्चा निघाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाराला मारहाण केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे. मनसेने या मोर्चामागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपसह शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेची दादागिरी सहन करणार नाही असाही इशारा दिला आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा मेळावा पाच तारखेला होणार आहे. तर दुसरीकडे मनसेच्या विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोधपूर स्वीटच्या मालकाला मारहाण केली आणि त्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मोर्चा काढला. पण हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपने काढला असा आरोप मनसेने केला आहे आणि आता मनसे ही मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढणार असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ज्या व्यापाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली ही घटना 29 जूनची आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मनसेने जल्लोष केला. त्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते जोधपूर स्वीट अँड नमकीन या दुकानात गेले. इथं मराठीवरून वाद होऊन व्यापाराला मारहाण झाली. महाराष्ट्रात कोणती भाषा बोली जाते? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला आणि व्यापाऱ्याला मारहाण केली. अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं सर्व अमराठी व्यापारी एकवटले आणि त्यांनी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
