AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात उद्रेक!! राहुल गांधींविरोधात आंदोलन, Video पाहा कुठे कुठे आंदोलन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रभर आंदोलन केलं जात आहे.

महाराष्ट्रात उद्रेक!! राहुल गांधींविरोधात आंदोलन, Video पाहा कुठे कुठे आंदोलन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2022 | 1:15 PM
Share

मुंबईः स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेद्वारे प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांनी सातत्याने विविध ठिकाणी वीर सावरकर यांच्याबाबत अशी वक्तव्ये केल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत.

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळं फाडणं, जोडे मारो आंदोलन तर कुठे पुतळा जाळण्याचे प्रकार घडले आहेत.

मनसेतर्फे सर्वात मोठं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेगावच्या दिशेने निघाले आहेत. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून हे आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

पुण्यात–

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका समोर भाजपचं झालं. “हे कसले भारत जोडो हे तर वैचारिक भारत तोडो” म्हणत भाजपने बॅनरबाजी केली.

मुंबईत–

दादर फुल मार्केट भागात भाजपने आंदोलन केलं. राहुल गांधी विरोधात भाजपचे युवा मोर्चाने हे आंदोलन केलं. सावरकर यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

ठाण्यातील–

गडकरी रंगायतन येथे भाजप कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या स्मृती स्तंभाला अभिवादन करून सुरु केले आंदोलन केलं. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी चुल्लुभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कुर्ल्यात–

वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधीचा जाहीर निषेध करण्याकरिता आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वा खाली मुंबईतील कुर्ला पूर्व स्थानकाजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चौकामध्ये हार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

नागपूरात–

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा ने नागपूरातील गणेश पेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली , आणि राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

परळीत–

राहुल गांधीं विरोधात परळी शहरातील टॉवर चौकात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. परळीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई टावर चौकात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून आपला रोष व्यक्त केलाय. राहुल गांधींनी समस्त जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

हिंगोलीत–

हिंगोलीत आज कळमनुरी शहरातील महाराणा प्रताप चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेस काळे ऑईल लावत निषेध व्यक्त करण्यात आलाय. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून वि.दा सावरकर यांचा जयघोष करण्यात आला. या वेळी मनसे, शिंदे गट व भाजपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.