मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात नेमकं काय घडलं?

| Updated on: May 07, 2026 | 3:17 PM

आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिस कोठडीत असून त्याला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिस कोठडीत असून त्याला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काल मध्यरात्री पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेची पुनर्रचना केली. यावेळी गोठ्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि कशाप्रकारे अत्याचार करण्यात आला, याबाबत सखोल माहिती घेतली गेली.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपीची पोलिस कोठडी १२ तारखेपर्यंत वाढवली आहे. या कालावधीत प्रकरणासंदर्भातील अधिक तपास करण्यात येणार आहे.

Published on: May 07, 2026 03:17 PM
Follow Us