Pune VIDEO :  माझ्या BF ला मेसेज का केला? राग अनावर, लाथाबुक्क्या अन्  राग अनावर… दोघींमध्ये राडा, शाळेचं आवार बनलं आखाडा

Pune VIDEO : माझ्या BF ला मेसेज का केला? राग अनावर, लाथाबुक्क्या अन् राग अनावर… दोघींमध्ये राडा, शाळेचं आवार बनलं आखाडा

| Updated on: Aug 23, 2025 | 5:43 PM

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस?’ या क्षुल्लक कारणावरून दोन मुलींच्या टोळ्या भिडल्या आणि शाळेचं आवार थेट रणांगण झालं. थप्पड, लाथाबुक्या, केस ओढणे आणि गलिच्छ शिव्या इतक्या घाणेरड्या पद्धतीनं मुलींचं भांडण पाहून नागरिक थरकापले.

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉयफ्रेंडला मेसेज का केला? असा सवाल करत या क्षुल्लक कारणावरून मुलींमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्यातील येरवडा येथील नेताजी शाळेच्या परिसरात हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री दहा साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास? असा जाब विचारत दोन मुलींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढून त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.  त्यानंतर या वादात आणखी काही मुली सामील झाल्या. शुल्लक कारणांवरुन झालेल्या वादात दोन मुलींच्या टोळ्या आपापसात भिडल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय. हे दोन मुलींचे गट एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापासून लाथाबुक्क्या, एकमेकींनी गलिच्छ शिव्या देण्यापर्यंत पोहोचले. हा सगळा तमाशा पाहून नागरिक थबकवले आणि संताप व्यक्त केला.

बघा व्हिडीओ

Beed Crime : दोघी जिवलग अन् दोघींचा एकच बॉयफ्रेंड… वाद अन् राग अनावर, मैत्रिणीनंच मैत्रिणीला संपवलं, मृतदेह भरला बॅगेत अन्…

Published on: Aug 23, 2025 05:34 PM