AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Case :  स्पाय कॅमेऱ्याचा वापर अन् स्वतःच्या पत्नीचे नको ते व्हिडीओ शूट, निलेश चव्हाणचे काळे कारनामे उघड

Vaishnavi Hagawane Case : स्पाय कॅमेऱ्याचा वापर अन् स्वतःच्या पत्नीचे नको ते व्हिडीओ शूट, निलेश चव्हाणचे काळे कारनामे उघड

| Updated on: May 24, 2025 | 11:29 AM
Share

निलेश चव्हाणच्या बायकोने त्याचा लॅपटॉप ओपन केला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं.

निलेश चव्हाण यानेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचे समोर आले आहे. स्पाय कॅमेऱ्यानं आपल्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पत्नीच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी निलेश चव्हाणवर २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जून 2018 साली निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला त्यांच्या बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळी तिने निलेशला याबद्दल विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली .

निलेश चव्हाण याचे हगवणे कुटुबांसोबत कौटुंबिक संबंध होता. कसपटे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं बाळ हगवणे कुटुंबीयांनी निलेश चव्हणाकडे दिलं होतं तेव्हा निलेश चव्हाणने त्याच्याकडील पिस्तूल कसपटे कुटुंबीयावर रोखली होती. निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबीयाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Published on: May 23, 2025 12:28 PM