Maharashtra Weather Updates : पुण्यासह तीन जिल्ह्यांसाठी पुढील 4 तास रेड अलर्ट
Maharashtra Heavy Rainfall Alert : पुण्यासह काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पुढचे 4 तास सतर्कतेचा इशारा दिला असून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पुण्यात आठ दिवसांपासून दररोज संध्याकाळी पाऊस पडत होता. नंतर पावसाचा वेग आणखी वाढला. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असतानाच आता पुण्यासह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. अशातच कालपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. अद्यापही कालच्या पावसाच्या तडाख्यातून नागरिक पुरते सावरलेले नसताना आता हवामान विभागाने पुणे शहरासह जिल्ह्यासतही पुढचे 4 तास सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पुण्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्याने कृपया घराबाहेर बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

