Early Monsoon Effect : मान्सूनचा वेळेआधीच धप्पा; खरीपाची पेरणी पूर्व कामं बाकी, शेतकरी चिंतेत
राज्यात मान्सून येऊन धडकला आहे. मात्र मान्सून पूर्व पावसात करण्यात येणारी पेरणीपूर्व तयारी करण्यास यंदा शेतकऱ्यांना वेळ मिळाला नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
राज्यात मान्सून दाखल झालेला आहे. यंदा मान्सून 12 दिवस आधीच राज्यात धडकला असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. दरवर्षी 6 जून नंतर येणारा मान्सून यंदा मे महिन्यातच आल्याने शेतकऱ्यांचा मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज चुकला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरणी पूर्वीची मशगतीची काम अद्यापही पूर्ण झालेली नसताना पाऊस मात्र येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे.
बांधबंदिस्त करणे, बंधावरील काडीकचरा साफ करणे, राब करणे अशी बरीच कामं या काळात शेतकरी करतात. त्यानंतर खरीपाच्या पेरणीला सुरुवात होत असते. यंदा काही उन्हाळ पिकं सुद्धा उशिराने आलेली आहे. त्यामुळे ही पिकं बाजारात पोहोचण्या आधीच पावसाने धप्पा देत शेतकऱ्यांना कोंडीत पकडलं आहे. एकीकडे उन्हाळ पिकांमध्ये होणारं नुकसान आणि दुसरीकडे खरीपासाठी पेरणी पूर्व तयारीत चुकलेला अंदाज यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला बघायला मिळत आहे.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

