PM Modi : ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी अन् मोदी भिडले, काँग्रेसच्या टीकेवर पंतप्रधानांचा पलटवार, 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटांत
दोन दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर संसदेमध्ये चर्चा झाली. चर्चेच्या शेवटच्या सत्रामध्ये राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
ऑपरेशन सिंदूरवरून दोन दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. सैन्यावर टार्गेट करणार नाही असे सांगून सरकार 30 मिनिटात सरेंडर झाल्याची टीका राहुल गांधींनी केली. त्यावर 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटात घेतल्याचे सांगून मोदींनी पलटवार केला. आपणच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचं वारंवार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्याच वक्तव्याचा दाखला देत राहुल गांधींनी मोदींना घेरलं. तर ट्रम्प खोटं बोलताय हे मोदींनी सांगावा, असं थेट चॅलेंजच दिलंय. तर सरकारवर तुटून पडणाऱ्या अमित शाहांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला. 2005 ते 2011 मध्ये 27 हल्ले काँग्रेसने केले? त्यावेळी काँग्रेसनं काय केलं? असा थेट सवालच शहांनी केला.
यासह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ज्या दहशतवाद्यांनी 26 भारतीयांची हत्या केली, त्या दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेव मध्ये खात्मा झाल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. मारले गेलेले दहशतवादी तेच होते की नाही याची ओळख त्यांच्याकडून सापडलेल्या रायफलच्या माध्यमातून झाल्याचे शहा यांनी सांगितले.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

