नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
राज्यात निवडणूकीची धामधुमी सुरु असतानाच सहा नोव्हेंबरला नागपूरात संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
येत्या सहा नोव्हेंबरला नागपूरात संविधान संमेलन होणार आहे. या संमेलनाला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंच या संघटनेने केलेले आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. ओबीसीचा जनगणना न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आम्ही धुळ्याला राहुल गांधी यांना भेटायला गेलेलो होतो. भारत जोडो दरम्यान 13 मार्च रोजी आम्ही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांना विर्दभात येण्याचे आमंत्रण दिले होते असे ओबीसी युवा अधिकार मंचाचे संयोजक उमेश कोरम यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत असेही उमेश कोरम यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 03, 2024 5:30 PM
Related Video
ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवासी रुळांवर उतरले अन् दुसऱ्या ट्रेनखाली चिरडले..4 जणांचा मृत्यू
T20 वर्ल्डकप स्पर्धेतही नो हँडशेक, हरमनप्रीतने फातिमाकडे केलं दुर्लक्ष
मुलांना यशस्वी व्यक्ती झालेलं पाहायचंय? मग त्यांना या पाच गोष्टी शिकवा
रोहित शर्माला आता पर्याय...रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान
वादळी पावसासह उष्णतेचाही तडाखा, 17 राज्यांना धोक्याचा इशारा
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद