मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…

मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…

| Updated on: Jun 23, 2026 | 6:31 PM

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली.

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भरत गोगावेंना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता
गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. याआधी अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी भरत गोगावलेंकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज मुंबईत भरत गोगावले, सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यात भरत गोगावलेंकडे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Published on: Jun 23, 2026 6:31 PM
Follow Us