Operation Sindoor : त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
Raj Thackeray On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला तेच अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर कारवाईवर कौतुक तर नाहीच मात्र राज ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावल्याचं बघायला मिळालं आहे.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिले टि्वट केलेले. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही,
Published on: May 07, 2025 02:14 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
