”ते” न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबत नाही; भरत जाधव यांच्यावर शिवसेना मंत्र्याचा पलटवार

| Updated on: May 24, 2023 | 7:40 AM

अभिनेता भरत जाधव यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही ते म्हणाले होते. त्यावरून अनेकांनी नाराजीचा सुर आवळला होता.

ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबत नाही; भरत जाधव यांच्यावर शिवसेना मंत्र्याचा पलटवार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून अभिनेता भरत जाधव यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही ते म्हणाले होते. त्यावरून अनेकांनी नाराजीचा सुर आवळला होता. याप्रकरणी त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही त्रुटी दूर करू असे म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा याचमुद्द्यावरून उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्यावर टीका केली आहे. तसेच आपल्यावर टीका या होत असतात. आपण त्यांना किंमत देत नाही. आरोप प्रत्यारोप होत असतात पण विधायक काम करतो असेही सामंत म्हणाले. तर भरत जाधव यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माफी मागत असताना तिकिटाचे पैसे परत करायला हवे होते. तर यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं. त्या अडचणी आम्ही नक्की दूर करू. परंतु एपिसोड किंवा इव्हेंट करण्यात काही अर्थ नाही. काय मी इकडे येणार नाही, तिकडे येणार नाही हे म्हणणे योग्य नसून ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबत नाही असा टोला लगावला आहे.