बारामतीच्या वाघासमोर कुणी सांगितला तासगावच्या क्रांतिकारकांचा इतिहास, हा व्हिडिओ पहायलाच हवा
उगवता सूर्य बघून जणू काळोखासुद्धा अंधाराचा त्याग केलाय. आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय, अशी भाषणाची दमदार सुरवात करून रोहित पाटील यांनी माजी गृहमंत्री आर. आर. ( आबा ) पाटील यांची आठवण करून दिली.
सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. अर्थात आबा पाटील ( R. R. PATIL ) यांचे भाषण ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असायची. विरोधकांना मोजक्या शब्दात टोले लगावत त्यांची फिरकी घेत आबा धोबीपछाड देत असत.
गृहमंत्री म्हणून विधिमंडळात आबांनी राज्यातील सावकार, बार बंदी आणि गुन्हेगारांबद्दल केलेलं ‘कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’ हे विधान खूप गाजलं होतं. अशा या आबांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा रोहित पाटील ( ROHIT PATIL ) पुढे चालवीत आहे.
तासगाव येथे एका कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( AJIT PAWAR ) आले होते. त्यावेळी रोहित पाटील यांनीही दमदार भाषण केलंच शिवाय तासगावचा क्रांतिकारी इतिहास उलगडून सांगितला.
Published on: Jan 21, 2023 8:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
