Mock Drill : उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
RSS And BJP : उद्या देशातल्या सगळ्या राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आलेले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये आत्या भाजप आणि संघ परिवार देखील सहभागी होणार आहे.
भाजप आणि संघ परिवार उद्या मॉक ड्रिलमध्ये सहाभागी होणार आहे. आरएसएस आणि भाजपचे नेते, खासदार आणि आमदार आपापल्या क्षेत्रात होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत. तशा सूचना नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. उद्या संपूर्ण देशभरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत असणाऱ्या तणावामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहे. या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
Published on: May 06, 2025 06:38 PM
Latest Videos
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

