RSS News : औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
RSS Clarify Stance On Aurangzeb Controversy : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा संयुक्तिक नाही, आम्ही कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केली आहे.
औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नाही. कोणत्याही हिंसाचाराच आम्ही समर्थन करत नाही, अशी भूमिका RSSने घेतली आहे. नागपूरमधील राड्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर RSS ने आपली भूमिका सांगितली आहे.
नागपूर हिंसेवर राष्ट्रीय हिंदू परिषदेने पहिल्यांदाच भाष्य केलं. एकीकडे नागपूरमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं मुख्यमंत्री म्हणत असतानाच RSSचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भूमिका स्पष्ट करत औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नाही. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजासाठी चांगला नाही. पोलीस याचा तपास करत आहे. ते नक्कीच घटनेच्या मुळाशी जातील.
दरम्यान, नागपूरातील हिंसेवर विश्व हिंदू परिषदेने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विश्व हिंदू परिषदेने सांविधानिक मार्गाने आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामुळे हिंसाचार भडकला असं म्हणण चूक असल्याचं गोविंद शेंडे यांनी म्हंटलं आहे.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
