मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
मुंबईमध्ये ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती लागू केल्यानंतर परिवहन विभागाकडून आजपासून कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातील स्वामीनारायण मंदिराबाहेर आरटीओच्या भरारी पथकाने टॅक्सी चालकांची तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, टॅक्सी चालकांना थांबवून त्यांना नोटीस दिली जात आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे का, याची चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र […]
मुंबईमध्ये ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती लागू केल्यानंतर परिवहन विभागाकडून आजपासून कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातील स्वामीनारायण मंदिराबाहेर आरटीओच्या भरारी पथकाने टॅक्सी चालकांची तपासणी सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत, टॅक्सी चालकांना थांबवून त्यांना नोटीस दिली जात आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे का, याची चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या समितीने डिझाइन केलेल्या 14 व्यवहारोपयोगी प्रश्नांपैकी किमान चार ते पाच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे बंधनकारक आहे. जर एखाद्या चालकाला मराठी येत नसेल, तर त्याला एक महिन्याची मुदत दिली जाईल. या मुदतीतही मराठी शिकण्यात अपयशी ठरल्यास, त्यांचा बॅच तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल.
अनेकांनी आरटीओ कार्यालयातून प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवले आहे. ही कारवाई आज दिवसभर सुरू राहणार असून, मराठी भाषेची सक्ती सुनिश्चित करण्यासाठी आरटीओ कटिबद्ध आहे.
