Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या….

Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या….

| Updated on: Nov 15, 2026 | 3:15 PM

रुपाली चाकणकर यांनी त्यांचे नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी यावर आक्षेप घेतला आहे. साड्या नेसणे किंवा क्लिप लावणे ही सामान्य बाब असल्याचे सय्यद म्हणाल्या. ट्रेडमार्कला अद्याप कायदेशीर मान्यता मिळाली नसल्याचा दावा करत, सय्यद यांनी हे पाऊल अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांची भूमिका साकारत असलेल्या सय्यद यांनी चाकणकर यांच्या या कृतीला आ बैल मुझे मार असे संबोधले आहे. दिपाली सय्यद यांच्या मते, साडी नेसणे किंवा केसात क्लिप लावणे या सामान्य बाबी आहेत आणि हे कुणाचे ट्रेडमार्क असू शकत नाही. तसेच रुपाली हे नाव अनेक मुलींचे असते.

ट्रेडमार्कला अद्याप कायदेशीर संमती मिळाली नसून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ५ नोव्हेंबर रोजी अर्ज करूनही परमिशन मिळालेली नाही. आपण एक कलाकार म्हणून व्यक्तिरेखा साकारली असून, लोक त्यावर प्रेम करत आहेत. ट्रेडमार्कच्या या अनावश्यक त्रासातून चित्रपटाच्या प्रदर्शनाला बाधा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सय्यद यांनी सूचित केले. या कायदेशीर लढाईला आपणही कायदेशीर उत्तर देत असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

Published on: Nov 15, 2026 3:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us