VIDEO : रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार;मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण-Russia Ukraine Crisis

VIDEO : रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार;मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण-Russia Ukraine Crisis

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 2:52 PM

रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार देखील करण्यात आला आहे. मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं आहे.

रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार देखील करण्यात आला आहे. मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं आहे. रशियाकडून युक्रेनमधली प्रसुतीगृहासह पोलीस हेडक्वार्टर्सवरती हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं रशियाला काय साध्य करायचं आहे, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल. सध्या दोन्ही देश एका निर्णायक ठिकाणी पोहोचले असून पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.