सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर… नेमकं काय म्हणाली?

सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर… नेमकं काय म्हणाली?

| Updated on: Jul 05, 2026 | 10:38 AM

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली. याच

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्यावर ठाकरे गटातील नेत्यांनी जोरादार टीका केली. संजय राऊत यांनी अहिर यांना ‘गद्दार’ असे देखील संबोधले. यावर आता सचिन अहिर यांच्या मुलीने भावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन अहिर यांची मुलगी किरण अहिर हिने व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी पक्ष का सोडला?’ याबद्दल सांगितले आहे. किरण अहिर हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरेंसाठी वडिलांनी विश्वासू नेता असतानाही राष्ट्रवादी सोडली, असं सांगण्यात आलं आहे. इतकेच नाही तर, २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंसाठी राष्ट्रवादी सोडून वडिलांनी पदाची अपेक्षा न करता निष्ठेने काम केलं, याचे फळ त्यांना आता मिळत आहे, असंही ती म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

Published on: Jul 05, 2026 10:38 AM
Follow Us