साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
Sakoli Assembly Result : महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचे सरकार पुन्हा येत आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठ्या धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे, कॉंग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय झाला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे धक्कादायक निकाल हाती येत आहेत. अनेक दिग्गजांचा या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोलीत अवघ्या १५२ मतांनी निसटता विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांचा पराभव केलेला आहे. साकोलीत नाना पटोले आणि अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांच्यात अटीतटीचा सामना झाला. त्यानंतर अवघ्या १५२ मतांनी नाना पटोले यांना आपला गड राखण्यात कसेबसे यश आलेले आहे. महाराष्ट्रात जेव्हा जागा वाटप सुरु होते, तेव्हा कॉंग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील खडाजंगीने महायुतीतील मतभेद उघड झाले होते. त्यामुळे नाना पटाेले यांच्या निवडणूकीकडे लक्ष लागले होते. अखेर नाना पटाेले यांचा कसाबसा विजय झाला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

