Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 17, 2026 | 11:33 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार खरेदी-विक्रीबाबत ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा दावा केला.

संजय राऊत यांनी सांगितले की, “काल रात्री एका महत्त्वाच्या व्यक्तीने मला महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. पक्षाचे नाव सांगितले गेले नाही आणि मीही ते नाव घेणार नाही. मात्र त्यावेळी ‘भाव काय आहे?’ असे विचारल्यावर ‘50 कोटींचा हमी भाव असून सुरुवातीला 15-15 कोटी रुपये दिले जातील,’ असे सांगण्यात आले.”

यावेळी राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही भाष्य केले. “आमच्या खासदारांबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. काही जण दिल्लीत असल्याचे सांगितले जाते, तर काही जण मतदारसंघात असल्याचे म्हटले जाते. मात्र आमच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटातील खासदार हे मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “हे खासदार पक्षाच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे जनादेशाशी बेईमानी करण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

तसेच पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “जर अशा पद्धतीने पक्ष तोडले आणि लोकप्रतिनिधी विकत घेतले जात असतील, तर लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”

दरम्यान, राज्यात ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत चर्चा सुरू असताना संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मात्र या आरोपांवर संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Published on: Jun 17, 2026 11:33 AM
Follow Us