Special Report | संजय राऊतांचा मोठा दावा शिंदे- अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर? सुप्रीम कोर्टाच्या विलंबावरून आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमकही रंगली. सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत, “स्वतः आपल्या पतीच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीने इतरांना निष्ठेचे धडे देऊ नयेत,” असा टोला लगावला. तर राऊत यांच्या या दाव्यामागे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा संदर्भ दिला आहे. शिवसेना संदर्भातील प्रकरणावर 1 एप्रिल रोजी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सुप्रीम कोर्ट यांनी ही सुनावणी पुढे ढकलत 23 एप्रिलची तारीख दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका करत त्यांना “चोर” म्हंटलं आणि सरन्यायाधीशांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही केला. शिवसेनेच्या खटल्याला जवळपास चार वर्षे लोटली असून, अद्याप अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
“सतत मिळणाऱ्या तारखांमुळे आमदारांमध्ये नाराजी वाढत आहे. या विलंबामुळेच शिंदे आणि अजित पवार गटातील आमदार वैतागून अखेरीस भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतील,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
Published on: Apr 03, 2026 10:51 AM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

