Sanjay Raut-Sharad Pawar Meeting : संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
'नरकातला स्वर्ग' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी आज राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. याचवेळी राऊतांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनाचं आमंत्रण देत या पुस्तकाची प्रत देखील भेट दिली आहे. 16 मे रोजी संजय राऊत यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होणार आहे. उद्धव ठाकरेंची या प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती असेल. दरम्यान, या भेटीच्यावेळी शरद पवार यांनी देखील राऊतांना बारामतीमधल्या युवा वन्यजीव छायाचित्रकार रोहन तावरे यांचं एक पुस्तक भेट दिलं. या भेटीत दोघांमध्ये संवाद रंगल्याचंही पाहायला मिळालं.
Published on: May 04, 2025 02:57 PM
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

