संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर

संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर

| Updated on: Sep 10, 2026 | 11:58 AM

संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. रॅपिडोमुळे रिक्षाचालकांसमोर आलेल्या संकटावर सरकारने मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. गरज पडल्यास आपण स्वतः परिवहन मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राऊत म्हणाले. तसेच, शाळेत धार्मिक निर्बंध लादण्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवेमुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर आलेल्या संकटावर सरनाईक यांनी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचे राऊत म्हणाले. सुरुवातीला त्यांना बैठकीला जाता आले नसले तरी, गरज पडल्यास भविष्यात परिवहन मंत्र्यांची नक्की भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी नमूद केले की, रिक्षाचालकांचा प्रश्न त्यांनीच यापूर्वी मांडला होता आणि सरनाईक यांनी त्याची दखल घेतली.

रिक्षाचालकांनी शासनाशी संवाद साधण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. तसेच, मीरा भाईंदर-वसई-विरार येथील एका शाळेत पर्युषण काळात विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, बटाटा, मुळा आणण्यास मनाई करण्याच्या निर्णयावरही राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला. धर्म घरात ठेवावा, शाळेत आणू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Published on: Sep 10, 2026 11:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us