Sanjay Raut Video : ‘कामख्यासमोर कापलेल्या रेड्याची शिंग…’, ‘वर्षा’वरून राऊतांना खळबळजनक नवा दावा अन् शिंदेंवर निशाणा
काळ्या जादुमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला घाबरताहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काळ्या जादूबद्दल संजय राऊतांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे.
मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. तर आज याच वर्षा बंगल्यावरून राऊतांनी नवा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मनात कसली भिती आहे? इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे” असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी ही मागणी केली. इतकंच नाहीतर “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर रेडे कापले त्यांची शिंग वर्षा बंगल्याबाहेरील लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असा स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. “आमचा विश्वास नाही, पण मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी मंतरलेले शिंग आणल्याचे आम्ही ऐकले आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत” असं संजय राऊत म्हणाले. तर “महाराष्ट्र पुरोगामी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले, तरीही महाराष्ट्र मध्ये अंधश्रद्धा कायम आहे. उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहेत, त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्याचे काम करत रहावे. आम्ही आमचे काम करत राहू” असं संजय राऊत म्हणाले.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

