Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 04, 2026 | 1:16 PM

अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राम मंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असून, मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रकरणात संघाची भूमिका ही दोषींना पाठीशी घालणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, मंदिर उभारणीसाठी अनेकांनी संघर्ष केला, बलिदान दिले आणि अनेक शिवसैनिकांनीही मोठा त्याग केला. “राम मंदिर संयमामुळे नव्हे, तर संघर्ष आणि बलिदानातून उभे राहिले आहे,” असे सांगत त्यांनी या आंदोलनात शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरही निशाणा साधला. “एखाद्या गुन्ह्यात अनेक जण सहभागी असतील, तर तो केवळ चोरीचा प्रकार नसून दरोडा असतो. राम मंदिरावर दरोडा पडल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे या प्रकरणात राम मंदिर ट्रस्टचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या प्रतिक्रियेचाही उल्लेख करत राऊत म्हणाले की, केवळ प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच ट्रस्टशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याने संशय अधिक बळावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, सुरू करण्यात येणारे आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षापुरते मर्यादित नसून, रामभक्तांना एकत्र आणण्यासाठी आहे. “ही केवळ सुरुवात आहे. रामभक्तांनी पुढे येऊन या कथित लुटीविरोधात आवाज उठवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

या वक्तव्यांमुळे राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून, संजय राऊत यांच्या आरोपांवर भाजप, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 04, 2026 1:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us