Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून…

| Updated on: Jun 24, 2026 | 11:12 AM

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकर यांच्या मराठी वाचनशैलीवरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकर यांच्या मराठी वाचनशैलीवरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच राहुल नार्वेकर यांच्या वाचनशैलीवर टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठी भाषिक राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता, लिहिता आणि बोलता येत नसल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले, “विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही आणि मराठीत विचारही करता येत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या आडनावावरूनही टोला लगावत, “हे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत. युरोपमधील नॉर्वे देशाशी यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध घ्यावा लागेल. हे परकीय नागरिक तर नाहीत ना?” अशी उपरोधिक टीका केली.

पुढे बोलताना राऊत यांनी राज्य सरकारच्या मराठी सक्तीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. रिक्षाचालकांनाही मराठी येणे आवश्यक असल्याचे धोरण सरकार राबवत आहे. मात्र त्याच सरकारने नियुक्त केलेल्या विधानसभा अध्यक्षांना मराठीचे ज्ञान नसणे आणि त्यांनी मराठीची थट्टा करणे हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणीही केली. “मराठीचा अपमान करणारी व्यक्ती त्या पदावर राहण्यास पात्र नाही. त्यामुळे त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या वाचनशैलीवरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेत असून, यावर पुढील काळात आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 24, 2026 11:12 AM
Follow Us